शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

नऊ हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा आधार

By atul.jaiswal | Updated: July 11, 2021 10:35 IST

Solar agricultural pumps : ९,३४३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ देण्यात आला असून, यापैकी ८,६२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप कार्यान्वित झाले आहेत.

- अतुल जयस्वाल

अकोला : सिंचनासाठी शेतकऱ्यांना विद्युत कृषिपंप जोडणी देण्यात मर्यादा येत असल्याने यावर उपाय म्हणू राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला आता शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या अकोला, बुलडाणावाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९,३४३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ देण्यात आला असून, यापैकी ८,६२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप कार्यान्वित झाले आहेत.

राज्यात कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी रोहित्र उभारून लघुदाब वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. एका रोहित्रावर जोडण्यांचा भार वाढल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार रोहित्र बिघडणे, विद्युत अपघात यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे सिंचनात अडथळे येतात. शिवाय ज्या भागात विजेचे जाळे नाही त्या ठिकाणी सिंचनासाठी डिझेल पंपांचाही वापर होतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत महाविरतणच्या अकोला परिमंडळातील अकोला जिल्ह्यात १२८१, बुलडाणा जिल्ह्यात ३५१७, तर वाशिम जिल्ह्यात ४५४५ अशा एकूण ९३४३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचा लाभ देण्यात आला आहे. यापैकी अकोला जिल्ह्यात सर्वच्या सर्व म्हणजे १२८१ पंप कार्यान्वित झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ३२१०, तर वाशिम जिल्ह्यात ४,१३५ सौर पंप शेतात बसवून कार्यान्वित करण्यात आले आहेत.

 

लाभार्थी हिस्सा केवळ दहा टक्के

या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीला केवळ दहा टक्के, तर अनुसूचित जाती व जमाती गटातील लाभार्थींना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित रकमेची पूर्तता शासनाकडून केली जाते. यामध्ये मिळणाऱ्या कृषिपंपाची आयुमर्यादा २५ वर्षे असून, देखभाल दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षांचा आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी