शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेगा’ कामांचे आजपासून ‘सोशल ऑडिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 10:18 IST

रोहयो कामांचा लेखाजोखा सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या जिल्हा अंकेक्षकांकडून घेण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) २०१९-२० या आर्थिक वर्षात विविध यंत्रणा आणि ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल आॅडिट) राज्यातील २१ जिल्ह्यांत ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये यंत्रणांकडून करण्यात आलेल्या रोहयो कामांचा लेखाजोखा सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या जिल्हा अंकेक्षकांकडून घेण्यात येणार आहे.केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्यात २१ जिल्ह्यातील ३८ तालुक्यांमध्ये विविध विभाग आणि ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाच्या सामाजिक अंकेक्षण संचालनालयाने २५ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २१ जिल्ह्यातील ३८ तालुक्यांत ४ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘नरेगा ’ कामांचे ‘सोशल आॅडिट’करण्यात येणार आहे. ‘सोशल आॅडिट’ मध्ये सामाजिक अंके क्षण संचालनालयाच्या जिल्हा अंकेक्षकांसह ग्राम साधन व्यक्तींकडून विविध यंत्रणा व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आलेल्या रोहयो कामांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित यंत्रणांकडून कामांचे संबंधित दस्तावेज आणि कामांची प्रत्यक्ष स्थिती यासंदर्भात पडताळणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यासंदर्भात दक्षता घेऊन व नियमांचे पालन करून रोहयो कामांचे ‘सोशल आॅडिट’करण्यात येणार आहे.‘या’कामांचे होणार ‘सोशल ऑडिट’!राज्यात २१ जिल्ह्यातील ३८ तालुक्यांत ‘नरेगा’ अंतर्गत करण्यात आलेल्या सिंचन विहिरी, वृक्ष लागवड, रोपवाटिका, घरकुल, फळबाग लागवड, अंतर्गत रस्ते, शेतरस्ते, पाणंद रस्ते, तुती लागवड, समाजमंदिर, शौचालय बांधकाम आदी कामांचे ‘सोशल आॅडिट ’ करण्यात येणार आहे.अहवालावर होणार ग्राम, तालुका स्तरावर जनसुनावणी!ग्रामपंचायतनिहाय रोहयो कामांचे ‘सोशल आॅडिट’ पूर्ण करण्यात आल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सद्यस्थितीत ‘आॅडिट’चा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवता येणार नाही. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, गावातील दक्षता समिती सदस्य व बचत गटातील एक महिला सदस्यास आॅडिटचा अहवाल देण्यात येणार असून, ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत जनसुनावणीसाठी अहवाल ठेवण्यात येणार आहे, तसेच संबंधित तालुका स्तरावर ‘सोशल आॅडिट’च्या अहवालावर जनसुनावणी घेण्यात येणार आहे.