नाल्यात चप्पल पडली, काढण्यासाठी गेलेला चिमुकला वाहून गेला
By नितिन गव्हाळे | Updated: July 13, 2023 20:01 IST2023-07-13T20:01:25+5:302023-07-13T20:01:37+5:30
पोलिस प्रशासनाने मुलाची शोधमोहीम सुरू केली आहे.

नाल्यात चप्पल पडली, काढण्यासाठी गेलेला चिमुकला वाहून गेला
नितीन गव्हाळे,अकोला : शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शहरातील नाल्याही ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. अशातच दहा वर्षीय मुलगा खेळत असताना, त्याची चप्पल नालीत पडली. चप्पल काढण्यासाठी तो गेला असता, नालीच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला. ही घटना बुधवारी रात्रीदरम्यान खैर मोहम्मद प्लॉटमध्ये घडली.
पोलिस प्रशासनाने मुलाची शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खैर मोहम्मद प्लॉटमध्ये राहणारा दहावर्षीय जियान अहमद इकबाल अहमद हा रस्त्याच्या बाजूला खेळत होता. दरम्यान, त्याच्या पायातील चप्पल लगतच्या नालीत पडली.
ही चप्पल काढण्यासाठी तो नालीजवळ गेला. परंतु, नालीचा अंदाज न आल्याने, तो त्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. घटनास्थळावर जुने शहर पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली असून, शोधमोहीम सुरू आहे.