धक्कादायक...सख्या मुलाने बापास दगडाने ठेचून मारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:50 IST2019-04-19T14:50:14+5:302019-04-19T14:50:55+5:30

खेट्री (जि. अकोला): घरगुती वादातून सख्या मुलाने बापाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील उमरा शेतशिवरात १८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.

Shocking ... Son killed his father by crushing stone | धक्कादायक...सख्या मुलाने बापास दगडाने ठेचून मारले!

धक्कादायक...सख्या मुलाने बापास दगडाने ठेचून मारले!

ठळक मुद्देसावरगाव येथील रहिवासी रामसिंग मेघा चव्हाण (४८)असे मृतकाचे नाव आहे.अंकुश रामसिंग चव्हाण असे आरोपी मुलाचे नाव आहे.१८ एप्रिलच्या मध्यरात्री अंकुशने त्याचे वडील रामसिंग यांची दगडाने ठेचून हत्या केली.

खेट्री (जि. अकोला): घरगुती वादातून सख्या मुलाने बापाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील उमरा शेतशिवरात १८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथील रहिवासी रामसिंग मेघा चव्हाण (४८)असे मृतकाचे नाव असून, ते चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सावरगाव येथील रहिवासी आहेत. अंकुश रामसिंग चव्हाण असे आरोपी मुलाचे नाव आहे.
रामसिंग चव्हाण यांचे उमरा शेतशिवरात शेत आहे. शेतातील कांदा गहू भुईमूग, या पिकांवर राखण करण्यासाठी रामसिंग व त्यांचा मुलगा अंकुश हे दोघे शेतात झोपायला जात होते. गेल्या काही दिवसापासून बापलेकांमध्ये घरगुती वाद सुरू होता. बाप मुलाला नेहमी शिवीगाळ करत होता. अंकुशला पोलिस भरतीमध्ये जाण्याची इच्छा होती. पोलीस भरतीसाठी जाण्यासाठी लागणारा खर्च तो बापाला मागत होता. परंतु रामसिंग त्याची मागणी फेटाळून लावायचे. याचा राग मुलाच्या मनात होता. अखेर १८ एप्रिलच्या मध्यरात्री अंकुशने त्याचे वडील रामसिंग यांची दगडाने ठेचून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार अकोला येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी बाळापूरचे उप विभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी भेट दिली.तसेच शवण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपी अंकुशलाा घटना स्थळावरूनच ताब्यात घेतले. हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

 

Web Title: Shocking ... Son killed his father by crushing stone