Shocking ... Mother commit Suicide after killed daughter by submerged in water | धक्कादायक ...चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईची जाळून घेऊन आत्महत्या

धक्कादायक ...चिमुकलीला पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईची जाळून घेऊन आत्महत्या

अकोला : डाबकी रोडवरील गजानन नगरमधील रहिवासी एका मातेने दोन वर्षीय चिमुकलीला घरातील पाण्याच्या टाकीत बूडवीले तर त्यानंतर स्वत:  जाळून घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दोघीनांही परिसरातील नागरिकांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषीत केले. रुपाली इंगोले असे मातेचे नाव असून चिमुकलीचे नाव आनंदी आहे.
डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मधील रहिवासी गिरीधर इंगोले हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी आणि दोन वर्षीय मुलगी आनंदी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी जानवी ही शेजारी खेळत होती. तर त्यांची सासू जळतन आणायला आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास रूपाली इंगोले यांनी लहाण मुलगी आनंदी हीला घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडविले. त्यानंतर रूपाली इंगोले हीने सुरुवातीला गळफास घेउन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गळफास घेणेच त्यांना न जमल्याने काही क्षणातच त्यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. घराच्या छताला दोर लटकलेला होता तर रुपाली इंगोले हे भयावह स्थीतीत पडलेल्या असल्याचे सासू-सासरे घरी आल्यानंतर त्यांना दिसले. वेदनादायी प्रकार पाहताच त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इंगोले यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर तातडीने डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून रुपालीचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला तर दोन्ही मुलींचा शोध घेण्यात येत असतांना जानवी नामक मुलगी तीथे आली मात्र दोन वर्षीय चिमुकली आनंदी दिसत नसल्याने तीचा शोध सुरु केला असता ती पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत दिसली. दोन वर्षाच्या चिमुकली आनंदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. हा प्रकार मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचा आहे की या मागील दुसरे काही कारण आहे, या संदर्भात पोलिस तपास करीत आहेत. तसेच या घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Shocking ... Mother commit Suicide after killed daughter by submerged in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.