बाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:38 IST2018-05-25T18:38:17+5:302018-05-25T18:38:17+5:30

बाळापूर : बाळापूर गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २५ मे रोजी आंदोलन करीत चपलांचा हार घातला. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याकरिता गुरुवारी ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

Shiva Sangram agitation blok development officer Balapur | बाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार!

बाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार!

ठळक मुद्देजबाबदार पदावरील व्यक्तीकडून महिलेच्या बाबतीत आक्षेपार्ह वागणुकीचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.‘शिवसंग्राम’ने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून, अशा अधिकाऱ्याला योग्य धडा शिकविण्याचा निर्धार केला. ‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीने २५ मे रोजी आपला तीव्र रोष व्यक्त करीत बाळापूर गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला.

बाळापूर : बाळापूर गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २५ मे रोजी आंदोलन करीत चपलांचा हार घातला. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याकरिता गुरुवारी ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
एका जबाबदार पदावरील व्यक्तीकडून महिलेच्या बाबतीत आक्षेपार्ह वागणुकीचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. ‘शिवसंग्राम’ने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून, अशा अधिकाऱ्याला योग्य धडा शिकविण्याचा निर्धार केला. या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २४ मे रोजी दिल्यानंतर ‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीने २५ मे रोजी आपला तीव्र रोष व्यक्त करीत बाळापूर गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. पदाची प्रतिष्ठा आणि जबाबदारीचे भान नसलेल्या अशा अधिकाऱ्यांच्या तोंडाला तर काळेच फासले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘शिवसंग्राम’चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
या आंदोलनाच्या वेळी ‘शिवसंग्राम’चे युवक जिल्हाध्यक्ष अक्षय पाटील झटाले, युवक उप-जिल्हाध्यक्ष पंकज घोगरे, बाळापूर तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल नळकांडे, पंकज खंडारे, निखिल बोरीकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शुभम ढोरे, संतोष खारोडे, अंकुश पाटील, सुशांत लांडगे, सोशल मीडियाप्रमुख धनंजय माळी, तालुका युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, विद्यार्थी शहर (पूर्व) अध्यक्ष आकाश जाधव, शहराध्यक्ष विद्यार्थी(पश्चिम) हरीश जंगम, बाळापूर शहराध्यक्ष सुमित घाटोळ, अमोल ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते.  

 

Web Title: Shiva Sangram agitation blok development officer Balapur