शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी अकोल्यात

By admin | Updated: May 9, 2017 02:56 IST

शिवसंपर्क अभियान ; चार जिल्ह्यांचा घेणार आढावा.

अकोला: शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येत्या १५ मे रोजी अकोल्यात दाखल होत आहेत. अकोला, बुलडाणा, अमरावती या तीन जिल्ह्यांचा आढावा यावेळी घेण्यात येईल. राज्य सरकारमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोधी पक्षाची भूमिका घेत भाजपला जेरीस आणल्याचे दिसून येते. शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन शिवसेनेने उभारलेल्या आंदोलनांमुळे विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अनेकदा कोंडी झाल्याचे समोर आले आहे. शेतकर्‍यांची कर्जमुक्ती व्हावी यासोबतच तूर खरेदीच्या विषयावरून सेनेने भाजप सरकारवर अनेकदा निशाणा साधला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्षात जाऊन पक्षाची मजबूत बांधणी करण्यासह शेतकर्‍यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. शिवसंपर्क अभियानाला मराठवाड्यातून सुरुवात करण्यात आली असून, पक्ष प्रमुखांनी आठ जिल्ह्यांचा आढावा घेतला. येत्या १५ मे (सोमवार)रोजी सकाळी १0 वाजता उद्धव ठाकरे अकोल्यात दाखत होत आहेत. यादरम्यान, अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका विशद केली जाणार आहे. शेतकर्‍यांशी साधणार संवाद शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच नगरसेवक १३ आणि १४ मे रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत. अकोला पूर्व मतदारसंघाची जबाबदारी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर असून, अकोला पश्‍चिम मतदारसंघासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे, अकोट मतदारसंघ- आमदार किशोर पाटील, बाळापूर मतदारसंघ-आमदार सुनील शिंदे आणि मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी वाशिम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांच्यावर सोपवली आहे. शेतकर्‍यांच्या समस्या व पक्षाचा इत्थंभूत अहवाल १५ मे रोजी उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी करण्यासह शेतकर्‍यांच्या विविध समस्या प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अकोला शहरात दाखल होत आहेत. आम्ही सरकारमध्ये सामील असलो तरी मुख्यमंत्री जोपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घेत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही.-खासदार अरविंद सावंत तथा पश्‍चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिवसेना