'शकुंतले'चा वनवास संपण्याची आशा; मध्य रेल्वेचे डीआरएम सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 08:32 PM2021-09-30T20:32:14+5:302021-09-30T20:32:41+5:30

Shakuntala's exile hopes to end : मध्य रेल्वेचे प्रादेशिक उप व्यवस्थापक एस.एस.केडिया यांना येथील रेल्वे स्थानकावरील लोको शेड माध्ये आज निवेदन देण्यात आले,

Shakuntala's exile hopes to end; Central Railway's DRM positive | 'शकुंतले'चा वनवास संपण्याची आशा; मध्य रेल्वेचे डीआरएम सकारात्मक

'शकुंतले'चा वनवास संपण्याची आशा; मध्य रेल्वेचे डीआरएम सकारात्मक

Next

मूर्तिजापूर : 'शकुंतला बचाव सत्याग्रहा'चे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक विजय विल्हेकर यांनी रणशींग फुंकल्यामुळे क्लीक निक्सन या ब्रिटीश कंपनीच्या गूलामगिरीतून नुकत्याच मुक्त झालेल्या 'शकुंतला' या रेल्वेचा अद्यापही न संपलेला 'वनवास' संपविण्याच्या सत्याग्रहातील दुसऱ्या टप्यात आज मध्य रेल्वेचे प्रादेशिक उप व्यवस्थापक एस.एस.केडिया यांना येथील रेल्वे स्थानकावरील लोको शेड माध्ये आज निवेदन देण्यात आले, आपल्यास्तरावर प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले व 'शकुंतले'चा वनवास संपण्याची अपेक्षा बळावली. 
         अचलपूर-यवतमाळ दरम्यान धावणारी नॕरोगेज रेल्वे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही क्लीक निक्सन या ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात होती. ही ब्रीटीश कंपनी आणि भारत सरकार दरम्यानचा करार संपुष्टात आल्यामुळे शकुंतला ब्रिटीशांच्या गूलामगिरीतून नुकतीच मुक्त झाली, मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालांमुळे सध्या ती बंद आहे व 'शकुंतले'चा वनवास अद्याप कायमच आहे.
            या लोहमार्गावरील पूल, रस्ते सुस्थितीत आहेत त्यामुळे अत्यल्प खर्चात हा ऐतिहासिक वारसा जतन होऊ शकतो. ही मोलाची बाब विचारात घेऊन शासनदरबारी कैफीयत मांडण्याचा निर्धार विजय विल्हेकरांनी केला. त्यासाठीच्या सत्याग्रहाच्या पहिल्या टप्प्यात विजय विल्हेकरांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने येथील स्थानक व्यवस्थापक सवाई यांना 'अचलपूर-यवतमाळ नॕरोगेज रेल्वे' आहे त्या स्थितीत युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. 
        आज डीआरएम केडिया येथील रेल्वे स्थानकाच्या नियमीत तपासणीसाठी आले असतांना या मागणीचे निवेदन थेट त्यांना देण्यात आले. त्यांच्या समवेत विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वातील शकुंतला बचाव सत्याग्रहींनी चर्चा केली. सुदाम काका देशमुख या तत्कालिन खासदारांना या रेल्वे संदर्भात वारंवार विनवण्या करणाऱ्या शकुंतलाताई देशमुख (ज्यांच्या पाठपुराव्यामुळे या रेल्वे गाडीचे 'शकुंतला' नामकरण झाले) यांचे सुपुत्र माधव देशमुख, मूर्तिजापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे, प्रा.सुधाकर गौरखेडे, पत्रकार अविनाश बेलाडकर, विलास नसले, अजय प्रभे, माधवराव काळे, संजय भारसाकळे, प्रविण कासारकर, सेवकराम लहाने, अरूण बोंडे या चर्चेत सहभागी झाले. डीआरएम केडिया यांनी 'या कामासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे, तो उपलब्ध करवून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, मी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करतो', असे आश्वासन दिले. मध्य रेल्वे चे वाणीज्य व्यवस्थापक बी.अरूणकुमार व अन्य अधिकारी त्यांच्या समवेत होते.

Web Title: Shakuntala's exile hopes to end; Central Railway's DRM positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.