'शकुंतला' बचाव सत्याग्रहाचे मूर्तिजापूरातुन फुंकले रणशिंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 07:59 PM2021-10-02T19:59:51+5:302021-10-02T19:59:57+5:30

Shakuntal Train : अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला', ही विदर्भाचं भूषण असलेली रेल्वेगाडी गेली अनेक वर्षांपासून बंद आहे.

'Shakuntala' rescue trumpet of Satyagraha blown from Murtijapur | 'शकुंतला' बचाव सत्याग्रहाचे मूर्तिजापूरातुन फुंकले रणशिंग 

'शकुंतला' बचाव सत्याग्रहाचे मूर्तिजापूरातुन फुंकले रणशिंग 

Next

मूर्तिजापूर :  अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला', ही विदर्भाचं भूषण असलेली रेल्वेगाडी गेली अनेक वर्षांपासून बंद आहे. ती आहे त्या स्थितीत सुरू करून हेरीटेज रेल्वे म्हणून जतन व्हावी व विदर्भात पर्यटनाला चालना देणारी ठरावी, अशी मागणी मध्य रेल्वेचे प्रादेशिक उपव्यवस्थापक एस.एस.केडिया यांना भेटून 'शकुंतला बचाव सत्याग्रह समिती'च्या वतीने दोन दिवसांपूर्वी केली आहे.  त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
     
 परंतु शकुंतला पुन्हा पूर्ववत सुरू करायची असेल, तर जनरेटा आवश्यक आहे. त्यादृष्टीने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून शंकुतलेचा थांबा असलेल्या समता नगर जवळ मूर्तिजापूर टाऊन पासून शंकुतलेच्या इंजिनाची प्रतिकृती बनवून थांब्याजवळील परिसर स्वच्छ करून रेल्वे रुळावरून इंजिन प्रतिकृती चालवत घेऊन जाऊन घोषणा बाजी करीत पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. त्याठिकाणाहुन पदयात्रा ही शहराच्या मुख्य रस्त्यावरून स्टेशन विभाग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ राष्ट्र वंदना घेऊन पडयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शकुंतला बचाव समितीचे विजय विल्हेकर, माधव देशमुख,प्रकाश बोनगीरे,पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर,प्रा सुधाकर गौरखेडे, पत्रकार विलास नसले , पत्रकार अजय प्रभे, पत्रकार बाळासाहेब गणोरकर ,पत्रकार संजय उमक,पत्रकार समाधान इंगळे,पत्रकार सुमित सोनोने ,पालनदास घोडेस्वार ,देवानंद जामनिक,दिनेश श्रीवास ,विलास वानखडे ,पंकज जामनिक,अरुण बोंडे, विलास वानखडे, देशमुख, प्रदिप देशमुख, अनिल जोंधळेकर, प्रकाश बोलगीरे, अविनाश बेलाडकर, प्रा. सुधाकर गौरखेडे, नागोराव तायडे, पालनदास घोडेस्वार ,सेवकराव लहाने, संजय खंडारे, संतोष धगोकार प्रभाकर इंगळे, अली सर,नागोराव लायडे,प्रहार संघानातर्फे संतोष इंगोले इत्यादिची उपस्थिती होती

Web Title: 'Shakuntala' rescue trumpet of Satyagraha blown from Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.