युवतीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:01 IST2020-02-11T15:01:32+5:302020-02-11T15:01:40+5:30

राजेश अरुण दंदी याने तिचा हात पकडून पाठलाग करून तिचा विनयभंग केला.

Sexual assault on a young woman; A case was registered against two | युवतीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

युवतीवर लैंगिक अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बाळापूर : घरात कोणी नसताना आरोपीने चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याने बाळापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला; परंतु आरोपीने प्रेमसंबंध असून, तिच्यावर अत्याचार केला नसल्याचा दावा पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
२१ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार रिधोरा येथील आरोपी राजेश अरुण दंदी याने तिचा हात पकडून पाठलाग करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर १४ आॅक्टोबर २0१९ रोजी घरात कोणीच नसल्याचे पाहून, आरोपी राजेश दंदी याने चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपी राष्ट्रपाल समाधान इंगळे हा घराबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबला होता. यावेळी आरोपीने कोणाला सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच दोघाही आरोपींनी लग्न संबंधाच्या वेळी मुलाकडील मंडळींना सांगून संबंध तोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. युवतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राजेश दंदी व राष्ट्रपाल इंगळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३५४, ५0४(३४), ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sexual assault on a young woman; A case was registered against two