साखरपुड्यापूर्वी युवतीचे प्रियकरासोबत पलायन!, प्रियकर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 04:51 IST2017-10-04T01:51:04+5:302017-10-04T04:51:10+5:30
साखरपुड्याची तारीखही ठरली; परंतु युवतीचे दुसर्याच युवकासोबतच प्रेमप्रकरण सुरू असल्याने, त्या युवकाने साखरपुडा दोन दिवसांवर आला असताना...

साखरपुड्यापूर्वी युवतीचे प्रियकरासोबत पलायन!, प्रियकर गजाआड
अकोला: शहरातील एका युवतीचे काही महिन्यांपूर्वी एका युवकासोबत लग्न जुळले. साखरपुड्याची तारीखही ठरली; परंतु युवतीचे दुसर्याच युवकासोबतच प्रेमप्रकरण सुरू असल्याने, त्या युवकाने साखरपुडा दोन दिवसांवर आला असताना, प्रेयसीला घेऊन पलायन केले. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी शोध घेत, युवती व तिच्या प्रियकराला हिंगोली येथून ताब्यात घेतले. प्रियकराला अटक करण्यात आली.
शहरातील एका युवतीचे कवाडे नगरातील निखिल अशोक तृ पसौंदर्य (२0) याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू हो ते. याची कुणकुण कुटुंबीयांना लागल्यानंतर त्यांनी युवतीसाठी वर शोधून तिचे लग्न ठरविले. ३ ऑक्टोबर ही साखरपुड्याची तारीखसुद्धा ठरविली; परंतु कुटुंबीयांनी ठरविलेले लग्न युवतीला रुचले नाही. साखरपुड्याच्या दोन दिवस अगोदरच प्रियकर निखिल तृपसौंदर्य याने युवतीला पळवून हिंगोली येथे नेले. कुटुंबीयांना ही बाब कळताच, त्यांनी खदान पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी युवतीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले.
दरम्यान, ही युवती तिच्या प्रियकरासोबत हिंगोली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हिंगोली येथे जाऊन युवती व तिच्या प्रियकरास ताब्यात घेतले. खदान पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी युवतीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. निखिल तृपसौंदर्य याला भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली.