शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार किमी महामार्गांना अवैध वाहतुकीचा विळखा

By admin | Updated: February 11, 2015 01:01 IST

एसटी महामंडळाने केले सर्वेक्षण; दररोज कोट्यवधीचा फटका.

अनिल गवई / खामगाव (बुलडाणा): राज्यातील तब्बल ७ हजार ३५१ मार्गांवर मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव राज्य परिवहन महामंडळाकडून मार्च २0१४ ते जानेवारी २0१५ पर्यंत राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाला दररोज कोट्यावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीत सातत्याने भर पडत आहे. छोट्या मार्गावर १५-२0 अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावतात. हीच परिस्थिती मोठय़ा आणि मध्यम मार्गावर आहे. मोठय़ा मार्गावर ५0-५५ अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या वाहनांमुळे प्रवासी वाहतूक करण्यार्‍या एसटी मंडळाला राज्यात दररोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. राज्यभर ही परिस्थिती कायम असल्याने एसटीच्या अहवालावर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. *अमरावती विभागात १६४५ मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूकअमरावती विभागातील सुमारे १६४५ मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती एका गुप्त सर्वेक्षणातून समोर आली आहे. अवैध प्रवासी वाह तुकीला आळा घालण्यासाठी महामंडळांकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मार्च २0१४ ते जानेवारी २0१५ पर्यंत राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही गोपनीय माहिती गोळा करण्यात आली आहे. यासंदर्भातील अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांच्या क्रमांकासह गुप्त अहवाल मुख्य सुरक्षा अधिकार्‍यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.