काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:51 PM2018-09-28T12:51:24+5:302018-09-28T12:55:41+5:30

अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे.

Sessions of allegations in Bharip and NCP | काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र 

काचेच्या घरात राहणाऱ्यांची एकमेकांवर दगडफेक; भारिप-राष्ट्रवादीमध्ये आरोपांचे सत्र 

Next
ठळक मुद्दे राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: जिनके घर शिशे के होते है, वो दूसरो पे पत्थर नही मारा करते...हिंदी चित्रपटातील हा संवाद दार्शनिक ठरला आहे. राजकारण या क्षेत्राला तर तो चपखलपणे आरसा दाखवितो. हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या अकोल्यात भारिप-बमंस व राष्टÑवादी काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली आरोपांंची दगडफेक ही काचेच्या घरात राहणºयांनी एकमेकांवर केलेली दगडफेक अशीच आहे. या आरोपांच्या सत्राला निमित्त ठरले ते राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व भारिप-बमंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांवर केलेले आरोप
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी जाहीर करताच काँग्र्रेसने आघाडीसाठी आंबेडकरांची गळाभेट घेतली. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेस सोबत आघाडी करू; पण राष्टÑवादी सोबत नाही. राष्टÑवादीचे नेते शरद पवार हे जातीयवादी आहेत, अशी बोचरी टीका केली. साहजिकच पवारांनी तत्परतेने पलटवार करून आंबेडकरांना त्यांच्या दोन निवडणुकांचे स्मरण करून दिले. ज्यावेळी आंबेडकरांनी पाठिंबा घेतला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? असा सवाल उपस्थित केल्यावर पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. अशी भूमिका आंबेडकरांनी घेतल्यावर सध्या राज्यभर आरोप-प्रत्यारोपाचे मोहळ उठले आहे. अकोला ही आंबेडकरांची राजकीय राजधानी त्याला अपवाद कशी ठरेल. अकोल्यात राष्टÑवादीच्या झाडून सर्व नेत्यांनी एकत्र येत आंबेडकरच खोटे असे हे पत्रकार परिषदेत ठासून सांगितले. या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची भूमिका अतिशय आक्रमक होती, त्यामुळे त्यांनाच टार्गेट करीत दुसºया दिवशी भारिपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी प्रत्युत्तर देत राष्टÑवादीच्या नेत्यांची वैचारिक पातळीच काढली. या पृष्ठभूमीवर पश्चिम वºहाडाच्या राजकारणाचा आढावा घेतला तर या दोन्ही पक्षांनी कधी ना कधी एकमेकांना सहकार्य करून सत्ता उपभोगल्याचे स्पष्ट होते.
अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर भारिप-बमसंला कधीही एकहाती सत्ता मिळालेली नाही. प्रत्येक वेळी त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाचा टेकू घ्यावा लागला, तर कधी अपक्षांना हाताशी घ्यावे लागले. यामध्ये भारिपाला काँग्रेस सोबत राष्टÑवादीचेही वावडे नव्हतेच. सध्याही अकोला जिल्हा परिषदेत भारिपला राष्टÑवादीचा टेकू आहेच. इतकेच नव्हे तर पुंडलिकराव अरबट यांच्या रूपाने सभापती पदही राष्टÑवादीला दिले आहे. शरद पवार जातीयवादी आहेत, तर मग त्यांचा पक्ष जिल्हा परिषेदच्या सत्तेत भारिपला कसा चालतो? या प्रश्नाचा दगड राष्टÑवादीने भारिपच्या घरावर मारला आहे. दुसरीकडे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राष्ट्रवादीवर भारिपने आगपाखड केली आहे. गुलाबराव गावंडे हे शिवसेनेचे विदर्भातील सर्वाधिक आक्रमक नेते. थेट बाळासाहेबांचे लाडके अशी त्यांची ओळख व ख्याती होती. त्यांनीही सेनेला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादी पुन्हा सेना व आता पुन्हा राष्टÑवादी अशी संगीत खुर्ची खेळली आहे. राष्टÑवादीतील अनेक नेते पक्षांतर करून आले आहेत, तर काहींची छुपी युती लपलेली नाही. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेतही; मात्र सरसकट साधन शुचिता कुठल्याच पक्षात नसल्याने राष्ट्रवादीने फेकलेले आरोपांचे दगड हे साहजिकच त्यांच्याच काचेच्या घरावर पडले आहेत.
या आरोप सत्रामुळे सध्या राजकारणाचा पेंडुलम हलता आहे. जनतेचे मनोरंजन होत आहे. उद्या राष्टÑवादीला सोबत घेत काँग्रेसने आंबेडकरांची आघाडीसाठी मनधरणी करून त्यांना मनवले, तर याच नेत्यांची मोठी अडचण होणार आहे. आज एमेकांवर दगडफेक करणाºयांनाच उद्या तुझ्या गळा माझ्या गळा गुुंफू ‘मतां’च्या माळा म्हणत गळाभेट घ्यावी लागणार आहे. कारण राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू अन् मित्र असत नाही.

 

Web Title: Sessions of allegations in Bharip and NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.