शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शेतकरी बचत गटामार्फत ग्राहकांना थेट टरबूज-खरबुजांची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 10:49 IST

मूर्तिजापूर शहर व आजूबाजूच्या परिसरात शेतमालाची विक्री करण्यात येत आहे.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: ‘लॉकडाऊन’दरम्यान शेतातील तयार झालेल्या मालाची विक्री कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत होता. यावर काही बचत गटांच्या शेतकऱ्यांनी पर्याय शोधून काढला आणि टरबूज-खरबुजांचा माल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याचा निर्णय घेतला. पोही येथील सरस्वती शेतमाल उत्पादक शेतकरी बचत गटामार्फत खरबूज-टरबुजाची थेट ग्राहकांना अल्प दरात विक्री करण्यात येत असल्याने बचत गटांनासुद्धा यातून चांगला फायदा होत आहे.मूर्तिजापूर तालुक्यांतर्गत येणाºया अनेक गावांतील शेतकºयांनी शेतमाल उत्पादक गट तयार केले असून, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर व आजूबाजूच्या परिसरात शेतमालाची विक्री करण्यात येत आहे.ग्राम पोही येथील सरस्वती शेतमाल उत्पादक बचत गटामार्फत ही विक्री होत असून, सिरसो, वडगाव-कुरूम, हातगाव, माटोडा, आमतवाडा, कंझरा व इतर ही गावांमध्ये शेतकरी बचत गट तयार करण्यात आले आहेत. यात महिला शेती शाळेचाही समावेश आहे. शेतात पिकविलेला माल बचत गटातील शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत रास्त भावात पोहोचविण्यात येत आहेत. विशेषत: या शेतमालात टरबूज आणि खरबूज या फळांचा समावेश आहे.शहरातील मुख्य चौकात टरबूज, खरबूज तसेच भाजीपाल्याची रोज विक्री केल्या जात आहे. यातून वीस हजार रुपयांची शेतकºयांना मिळकत होत आहे.कंझरा येथील शेतकरी जयेश देशमुख यांच्या सहा ते सात एकर शेतीमध्ये तसेच पोहीचे सदानंद नाईक यांच्या पाच एकर शेतीमध्ये टरबूज व खरबूज या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. यामधून ‘लॉकडाऊन’च्या काळात शेतकरी वर्ग ‘सोशल डिस्टन्स’चे भान राखून शासनाच्या निर्देशाचे पालन करून थेट ग्राहकांना आपल्या मालाची विक्री करीत ग्राहकांनाही ती परवडत असल्याने येथे मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विशेष म्हणजे, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळून विक्री केल्या जाते. या विक्री केंद्राला उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल गोरे व कृषी सहायक प्रशांत दशरथी यांनी भेट देऊन कौतुक केले.

सात एकर शेतामध्ये टरबूज, खरबुजाचे उत्पादन घेतले. संचारबंदी असल्याने माल कसा विकावा, हा प्रश्न होता; परंतु कृषी विभागाच्या सहकार्याने बचत गटाच्या माध्यमातून टरबूज, खरबुजाची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येत असल्याने फायदा झाला आहे.-जयेश देशमुख,शेतकरी, कंझरा.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरी