बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 02:04 PM2019-06-22T14:04:21+5:302019-06-22T14:04:26+5:30

शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला.

Seed mafia should not be prepared! - 'Warnings of' CEOs | बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा  

बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा  

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात अनधिकृत बियाण्याच्या माध्यमातून बियाणे माफिया तयार होऊ देऊ नका, अनधिकृत बियाणे विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला.
दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, वृक्ष लागवड, पीक कर्जाचे वाटप इत्यादी विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अकोला तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे व गटविकास अधिकारी राहुल शेळके उपस्थित होते. एचटीबीटी अनधिकृत बियाण्याचा वापर कुठे-कुठे सुरू आहे, अशी विचारणा करीत अनधिकृत बियाणे विक्रीतून शेतकºयांची फसवणूक होणार नाही, यासाठी गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. अकोला तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये टँकरच्या फेºया व्यवस्थित होतात की नाही, यासंदर्भात गावनिहाय माहिती घेतली. तसेच वृक्ष लागवडीसाठी करण्यात आलेले खड्डे आणि पीक कर्ज वाटपाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला. या बैठकीला तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक व रोजगारसेवक उपस्थित होते.

अनधिकृत सावकारी थांबविण्याचे निर्देश!
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे अनधिकृत सावकारी थांबवून, शेतकºयांना अधिकृत कर्ज मिळाले पाहिजे. कोणत्याही प्रकारची अवैध सावकारी होणार नाही, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

पाणंद रस्त्यांची पडताळणी करा!
सात-बारावर असलेले आणि सात-बारावर नसलेले पाणंद रस्ते यासंदर्भात पडताळणी करून, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून, रोहयो अंतर्गत तालुक्यातील सर्व पाणंद रस्त्यांची कामे करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या. पाणंद रस्त्यांची कामे केल्यास गावातील वाद मिटतील, असेही त्यांनी सांगितले.


मुख्यालयी राहणाºया कर्मचाºयांची माहिती शासनाकडे पाठवा!
तालुक्यात किती कर्मचारी मुख्यालयी राहतात, अशी विचारणा करीत, यासंदर्भात माहिती एकत्रित करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या बैठकीत दिले.

 

Web Title: Seed mafia should not be prepared! - 'Warnings of' CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.