शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जागा २४८२,  विद्यार्थ्यांची नोंदणी ४ हजार ३८0;  कोणाला लागणार २५ टक्के प्रवेशाची लॉटरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:30 PM

२0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे२८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३८0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. २0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत७ मार्चपर्यंत ही नोंदणी आठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

- नितीन गव्हाळे

 अकोला : आरटीईनुसार इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. पालकांच्या सोयीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने नोंदणीची मुदत ७ मार्च केली असल्याने, आता विद्यार्थ्यांची आणखी नोंदणी वाढणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३८0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. २0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वास्तविकता, २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही वंचित घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती, धर्मातील दिव्यांग मुले, तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणारे, खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु, प्रक्रियेमध्ये एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले, पती-पत्नी दोघेही शासकीय नोकरीत असूनही ते सुद्धा २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यासाठी बोगस उत्पन्नाचे प्रमाणपत्रही हे लोक जोडतात. त्यामुळे एक लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात अनेक पालकांनी पुराव्यांसह शिक्षणाधिकाºयांकडे तक्रारी केल्या. परंतु, या तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आरटीईच्या २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने यावर तोडगा काढण्याची मागणी पालकांनी केली आहे. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थीही लाभ घेत असल्याने, यंदा २४८२ जागांसाठी चार हजारांच्यावर आॅनलाइन नोंदणी झाली आहे. ७ मार्चपर्यंत ही नोंदणी आठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशाची लॉटरी कोणा-कोणाला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रहिवासी दाखलाही मिळवितात बोगसपालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून एक किमी, तीन किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरील शाळेचा समावेश आॅनलाइन अर्जात करावा लागतो. शाळेपासून एक किमी अंतराच्या परिसरात राहणाºया पालकाला प्रवेशासाठी प्राधान्य मिळत असल्याने, अनेक पालक एक किमी, तीन किमी शाळेच्या परिसरात राहत असल्याचे बोगस रहिवासी प्रमाणपत्र, पुरावा जोडत असल्याचे प्रकार घडत आहेत.खात्रीशीर प्रवेश मिळेलच असे नाही?शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५ टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत/लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच, याची शाश्वती नाही.नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही विशेष तपासणी करू. परंतु, आर्थिकदृष्ट्या पालक सक्षम आहेत, शासकीय नोकरीत आहेत, असे शाळांना आढळून आल्यास, त्यांचे प्रवेश नाकारणाºयाचे अधिकार मुख्याध्यापक, संस्थेला आहेत. सुखसंपन्न विद्यार्थ्यांमुळे गरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागते, हे खरे आहे. यासंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकSchoolशाळा