शालेय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
By सचिन राऊत | Updated: March 10, 2024 15:39 IST2024-03-10T15:39:09+5:302024-03-10T15:39:51+5:30
खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या व नवव्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.
खदान परिसरातील रहिवासी अल्तमेश बेग इम्रान बेग हा विद्यार्थी सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या गुरुनानक विद्यालयात इयत्ता नवव्या वर्गामध्ये शिकत होता. त्याला दोन शिक्षकांकडून मारहाण करणे तसेच मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या शिक्षकांच्या मारहाणीमुळे व मानसिक त्रासामुळेच मुलाने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्याच्या आरोपही पालकांनी केला आहे.
अल्तमेशला दोन दिवसांपूर्वी शिक्षकांनी मारहाण करीत शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी असा आरोपही आई-वडिलांकडून केल्या जात आहे. अल्तमेश बेगने त्याचा राहत्या घरी वरच्या खोलीमध्ये अभ्यासासाठी जात असल्याचे सांगून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून दोषीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.