शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

हातरुणच्या १३० विद्यार्थिनींनी पाठविल्या सैनिकांना राख्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:28 IST

हातरुण ( जि. अकोला ) :  भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर असताना महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात सहभागी होऊन  देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

ठळक मुद्दे १३० विद्यार्थिनींनी सहभागी होऊन पोस्टकार्डवर आपल्या सैनिक भावाला संदेश पाठवला. राखी हे बहीण भावाचे 'बंधुत्वाचं नातं'  दृढ करेल असा विश्वास पोस्टकार्डद्वारे संदेश लिहतांना विद्यार्थिनींनी व्यक्त केला. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे अँडम ऑफीसर कर्नल शहा रोहित व्ही. यांच्याकडे सर्व राख्या आणि पोस्टकार्ड संदेशाचा बॉक्स सुपूर्द केला.

-  संतोष गव्हाळेहातरुण ( जि. अकोला ) :  भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र असलेला रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर असताना महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमात सहभागी होऊन  देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. हातरून येथील महात्मा गांधी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमात १३० विद्यार्थिनींनी सहभागी होऊन पोस्टकार्डवर आपल्या सैनिक भावाला संदेश पाठवला. शुक्रवारी दुपारी हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नरहरी बोरसे होते. यावेळी अमृत पवार, प्रा. रवी हेलगे, सुनील जाधव, कौशिक पाठक, जयपाल घोती, रमेश फुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते. सैनिकांचे शौर्य, देशप्रेम आणि देशभक्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम देशभक्ती आणि बंधुत्वाचा संदेश देणारा ठरणार असल्याचे विचार मुख्याध्यापक नरहरी बोरसे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधनाला  पाठवलेली राखी हे बहीण भावाचे 'बंधुत्वाचं नातं'  दृढ करेल असा विश्वास पोस्टकार्डद्वारे संदेश लिहतांना विद्यार्थिनींनी व्यक्त केला. महात्मा गांधी विद्यालयातील १३० विद्यार्थिनींनी पोस्टकार्ड लिहून पाठवलेल्या राखीचा स्वीकार करण्याची सैनिक भावाला विनवणी केली. देशभक्ती आणि बंधुत्वाचा संदेश देणारा हा उपक्रम अमृत पवार, प्रा. रवी हेलगे, कौशिक पाठक, सुनील जाधव, जयपाल घोती यांच्या प्रयत्नामुळे साकारला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवर कार्यरत सैनिकांचे योगदान देशासाठी अत्यंत महत्वाचे असल्याच्या भावना सैनिक बांधवांना पोस्टकार्डद्वारे लिहून व्यक्त केल्या. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे अँडम ऑफीसर कर्नल शहा रोहित व्ही. यांच्याकडे  मुख्याध्यापक नरहरी बोरसे, अमृत पवार, प्रदीप भडंग यांनी या सर्व राख्या आणि पोस्टकार्ड संदेशाचा बॉक्स सुपूर्द केला. कार्यक्रमाला शालिग्राम डिवरे, रमेश फुंडकर, प्रदीप भडंग, प्रा.रवी हेलगे, हिरामण चव्हाण,जयपाल घोती, अमृत पवार, कौशिक पाठक, सुनील जाधव, पांडुरंग चोपडे, हरिदास गोरे, श्रीपाद चोपडे, गजानन माहोकार, गजानन ठाकरे, रामदास कोगदे, विलास नागळे, सिद्धार्थ डोंगरे, राजेश फोकमारे, संतोष गव्हाळे उपस्थित होते.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली!

दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले २९ वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांना महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकवृंद  आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली.

देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रति प्रत्येकच भारतीय नागरिकांच्या मनात कृतज्ञतेचा भाव असतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. "एक राखी सैनिकांसाठी" या उपक्रमात विद्यार्थिनींनी घेतलेला सहभाग महत्वपूर्ण आहे.  - अमृत पवार, शिक्षक, म.गांधी. विद्यालय, हातरुण.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळाSoldierसैनिक