शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रीपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 1:30 PM

भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.

ठळक मुद्देदूरसंचार मंत्रालय व ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री पदाचीही जबाबदार त्यांना देण्यात आली आहे.धोत्रे यांच्या रूपात अकोला जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे.दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी इतर मंत्र्यांसोबत शपथ घेतली होती.

- अतुल जयस्वाल

अकोला : पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, यामध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चौथा विजय मिळविलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. याशिवाय दळणवळण मंत्रालय व ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री पदाचीही जबाबदार त्यांना देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी गुरुवारी पार पडल्यानंतर शुक्रवारी मंत्रीमंडळाची पहिली बैठक होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर आज खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये संजय धोत्रे यांना तीन मंत्रालयातील राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात सलग चौथा विजय मिळवून खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित करून त्यामध्ये आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. खा. धोत्रे यांच्यातील नेतृत्व गुण हेरत भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. खा. धोत्रे यांच्या रूपात अकोला जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. काल सायंकाळी दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी इतर मंत्र्यांसोबत शपथ घेतली होती.लोकसभेच्या १७ व्या निवडणुकीत अकोला मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्यावतीने खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शड्डू ठोकल्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. काँग्रेसच्यावतीने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपच्या अ‍ॅड. धोत्रे यांना होईल, असा कयास सुरुवातीपासूनच लावला जात होता. २०१४ मधील राजकीय पटलावरील घडामोडी व मोदी लाट पाहता यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. यंदाच्या निवडणुकीत १८ लाख ६१ हजार ७३९ मतदारांपैकी ११ लाख १६ हजार ७६३ मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला. यावेळी निवडणुकीत १ लाख ९१ हजार ८७८ नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यापैकी तब्बल १ लाख ४४ हजार ४७८ मतदारांनी मतांचे दान केले होते. ही वाढीव टक्केवारी खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या पारड्यात पडल्याचे निकालाअंती समोर आले.

 

 

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपाAkolaअकोलाpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी