नागपूर-अमरावती महामार्गावर वाळूचा ट्रक उलटून अकोल्यातील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:03 IST2020-02-23T13:00:11+5:302020-02-23T13:03:54+5:30
यामध्ये चालक जब्बार शहा (५०) व क्लिनर शेख नईम (३६) दोघेही रा. अकोला यांचा रेतीखाली दबून मृत्यू झाला.

नागपूर-अमरावती महामार्गावर वाळूचा ट्रक उलटून अकोल्यातील दोघे ठार
अकोला : वाळूने भरलेला ट्रक उलटून अकोल्यातील दोघे जण ठार झाल्याची घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगावनजीकच्या सत्याग्रही घाटात रविवारी पहाटे घडली.
नागपूरकडून कन्हान रेती घेऊन येणारा एमएच ३० एबी ४५३९ क्रमांकाचा ट्रक सत्याग्रही घाटात आला असता अचानकपणे समोरचा टायर फुटला. यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्याच्याकडेला जाऊन उलटला. यामध्ये चालक जब्बार शहा (५०) व क्लिनर शेख नईम (३६) दोघेही रा. अकोला यांचा रेतीखाली दबून मृत्यू झाला. ही घटना रविवारच्या पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जेसीबीच्या साहय्याने ट्रक बाजूला करून दबलेले दोन्ही मृतदेह काढुन घटना स्थळाचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासनीकरीता आर्वी येथील ग्रामीन रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.