ग्रामीण भागात निवडणूक रणधुमाळी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:26 IST2017-10-04T20:23:15+5:302017-10-04T20:26:15+5:30
बोरगाव मंजू (अकोला) : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचायतीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून सरपंचाची निवड थेट मतदानाद्वारे करण्यात येत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

ग्रामीण भागात निवडणूक रणधुमाळी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू (अकोला) : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एकूण २0 गावातील ग्राम पंचायतीच्या गत पंचवार्षिक संपल्यानंतर सरपंच व सदस्य पदाकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांकडून सरपंचाची निवड थेट मतदानाद्वारे करण्यात येत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
बोरगाव मंजू परिसरातील २0 ग्राम पंचायतींच्या सरपंच व सदस्य पदांकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या २0 गावातील मतदार प्रथमच सरपंचांना मतदान करून थेट निवडून देणार आहेत. या पृष्ठभूमीवर सध्या या सर्व गावांमधील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान प्रत्येक उमेदवार आपल्याच हातात सत्ता येईल व आपणच निवडून येणार, अशा थाटात असून, त्यांचे कार्यकर्ते त्यांचे उमेदवारच निवडून येणार असल्याचे दावे व मतांची आकडेमोड करून मतदारांना सांगत आहेत. यामुळे अशा चर्चा सध्या पानवठय़ावर व सर्वत्र होत असल्याने सर्वसामान्य जनतेतही चर्चांना उधाण आले आहे. बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द एकूण २0 गावात मतदान केंद्रावर मतदान होईल. यामध्ये वाशिंबा, मासा, सुकळी नदापूर, वणी रंभापूर, अन्वी, निपाणा, मारोडी, सिसा, अंबिकापूर, बिरसिंगपूर, रामगाव, मिर्झापूर, खडका, कट्यार, सोनाळा, कोठारी, कौलखेड, वरोडी, देवळी, मारोडी आदी गावांचा समावेश आहे. या २0 गावातील सरपंच व सदस्य पदाकरिता निवडणूक होत असून, उमेदवार त्यांचे भाग्य आजमावत आहेत. तथापि, गाव विकासासाठी जनता कुणाच्या गळ्यात माळ घालेल, हे चित्र निवडणूक निर्णय झाल्यावरच समोर येईल, एवढे मात्र निश्चित.