शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सोन्याचे आमिष देऊन लुटमार करणारी टोळी कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 6:02 PM

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी अटक केली.

अकोला : सोन्याचे बिस्कीट विक्री असल्याचे सांगून सदर सोने स्वस्तात देण्याचे आमिष देऊन रोकड घेऊन येणाऱ्या खरेदीदाराला लुटणाºया आंतरराज्यीय टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी रविवारी अटक केली. सदर टोळीतील आरोपींची १९ सप्टेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.खंडेलवाल शोरूमजवळ सोन्याचे आमिष देऊन लुटमार करणारी टोळी असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली होती. त्यांनी या टोळीवर पाळत ठेवून गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील रहिवासी भिका साहेबराव पाटील, सुरत जिल्ह्यातील भानुदास जगन्नाथ ढोडे, सुरत जिल्ह्यातील गडोदरा येथील रहिवासी राजकुमार टीकाराम नागपात्रे, सुरत येथील एकता नगर सोसायटीमधील जयेश किशोर सेंदाने, सुरतमधील गडोदरा नेर येथील रवींद्र गोरख पाटील, नंदुरबार येथील रवींद्र प्रकाश नायस्कर, जळगाव खान्देश जिल्ह्यातील उटखोडा येथील राजू गुलाब पाटील या सात जणांना अटक केली होती. या टोळीकडून तलवार, धारदार शस्त्र, रोख सहा हजार रुपये, सात मोबाइल व एक चारचाकी वाहन असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी