शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान; निबंध स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा अकोला : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ज्या योजनांची अंमलबजावणी विविध प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे ...

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अकोला : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ज्या योजनांची अंमलबजावणी विविध प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे करावयाची आहे, अशा योजनांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथील नियोजन भवनात आयोजित संयुक्त बैठकीत घेतला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पवनकुमार खचोट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे तसेच सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. त्याअंतर्गत पंडित दिनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमणे नियमानुकूल करणे योजना, महाआवास ग्रामीण अभियान, पंतप्रधान आवास योजना - शहरी व ग्रामीण, आदिवासी पुनर्वसन गाव घरकुल वाटप योजना, माझी वसुंधरा अभियान, नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण - २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे मग्रारोहयोअंतर्गत गावांतील विकासकामांचे अभिसरण करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. रोहयोच्या कामांबाबतही आढावा सादर करण्यात आला.

या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. लाभार्थ्यांच्या अंतिम निवडसह प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.