शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगत बांधकाम साहित्य; ३० हजारांचा दंड वसूल

By admin | Updated: May 12, 2014 23:28 IST

अतिक्रमण विभागाची धडक मोहीम सुरू

अकोला : रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना मनपाने वठणीवर आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामधूनच अतिक्रमण विभागाने सोमवारपासून धडक मोहीम सुरू करीत पहिल्याच दिवशी ३० हजार रुपयांची गंगाजळी मनपाच्या तिजोरीत जमा केली. मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार ही मोहीम संपूर्ण शहरात राबवली जाणार आहे.
महापालिकेच्या नगर रचना विभागातील अधिकारी व पदाधिकारी खिशात असल्याच्या आविर्भावात काही बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम केले. नगरसेवकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांच्या ओळखीचा गैरफायदा घेण्यात येत आहे. त्यामुळेच निर्माणाधीन इमारतींचे साहित्य रस्त्यालगत ठेवल्या जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह दुचाकीस्वार कमालीचे त्रस्त होत आहेत. वाहतूक विस्कळीत होण्यासोबतच अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवणार्‍यांविरुद्ध दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. त्यानुषंगाने अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांनी रविवारी व सोमवारी मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारला असता, रणपिसे नगरस्थित बारा ज्योतिर्लिंग मंदिरासमोर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य आढळून आले. गोपाल सोमानी नामक व्यावसायिकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, रस्त्यालगत रेती, गि˜ी पसरल्याचे दिसून आले. याप्रकरणी सोमानी नामक व्यावसायिकाला १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. राऊतवाडी परिसरात चेतन ठाकरे तसेच श्रीराम कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम व्यावसायिकांनासुद्धा प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारला. ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.


५ हजारासाठी तीन तास अन् आता...
उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनीसुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची मोहीम राबवली होती. बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अवैध बांधकाम करणार्‍या एका बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यालगत रेती, गि˜ी, विटा ठेवल्याप्रकरणी डॉ. गुटे यांनी ५ हजाराचा दंड बजावला होता. त्यावेळी संबंधित व्यावसायिकाने पैसे देण्यासाठी डॉ. गुटे यांना अक्षरश: तीन तास ताटकळत ठेवले होते. आता निमूटपणे दहा हजार रुपये मनपाकडे जमा केले. मागील काही दिवसांपासून संबंधित व्यावसायिकाचा नातेवाईक अवैध बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी आयुक्तांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती आहे. या दबावतंत्राला आयुक्त कसे उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.