बाल शिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:36+5:302021-02-05T06:18:36+5:30

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंताचा सत्कार अकाेला : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ता ...

Republic Day at Bal Shivaji School | बाल शिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिन

बाल शिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिन

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंताचा सत्कार

अकाेला : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत वर्ग ५च्या समृद्धी हरिश्चंद्र काळंके हिने राज्यातून ९वी येण्याचा मान मिळवला तर वर्ग ८वीच्या स्वरांजली शिरीष कडू हिने राज्यातून १७वी येण्याचा मान मिळवला आहे. यावेळी या विद्यार्थिनींना बाबासाहेब पाठक व मोहन गद्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

लोकशाही निकोप ठेवा पापळकर

अकोला : लोकशाही निकोप व प्रभावी राखण्यासाठी मतदारांनी अधिकाधिक जागरूक असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील लोकशाही सभागृहात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. नीलेश अपार, ब्रॅण्ड ॲम्बेसेडर जयश्री पाटील तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नवमतदार आदी उपस्थित होते.

Web Title: Republic Day at Bal Shivaji School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.