शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रस्त्यांवरील अतिरिक्त पथदिवे हटविणार - महापौरांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:30 PM

लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी संपूर्ण शहरात उभारण्यात आलेले अतिरिक्त पथदिवे हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत.

अकोला: शहरात अवघ्या पंधरा ते वीस फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारल्या जात असल्यामुळे ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, यासंदर्भात लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी संपूर्ण शहरात उभारण्यात आलेले अतिरिक्त पथदिवे हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुषंगाने अतिरिक्त पथदिवे हटविण्यासोबतच विविध तक्रारींचे तातडीने निरसन करण्यासाठी लवकरच आउटसोर्सिंगमार्फत २२ लाइनमनची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे.महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरात सर्वत्र एलईडी लाइट उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त १० कोटी व त्यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून जमा केलेले १० कोटी असे एकूण २० कोटी रुपयांतून रॉयल इलेक्ट्रानिक पुणे, यांच्यावतीने शहरातील ११० मुख्य रस्ते व ५५ मुख्य चौकांमध्ये एलईडी पथदिवे उभारण्यात आले. त्यापाठोपाठ राज्य शासनाने एलईडी लाईटसाठी ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. मनपाने ‘ईईएसएल’ कंपनीसोबत १९ कोटी ९० लक्ष रुपयांचा करार केला असून, यामध्ये लाइट उभारणीसाठी १३ कोटी ९० लक्ष रुपये व देखभाल दुरुस्तीपोटी ६ कोटी रुपये चौदाव्या वित्त आयोगातून अदा केले जाणार आहेत. एकूणच, आजरोजी शहरात ४० कोटीतून एलईडी लाइट उभारल्या जात असताना अनावश्यक ठिकाणी लाइट लावल्या जात असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा उरफाटा प्रकार होत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

२२ लाइनमनची होणार नियुक्तीशहरात सुमारे २६ हजारपेक्षा जास्त एलईडी लाइटमुळे झगमगाट होणार असला तरी वेळोवेळी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तसेच अतिरिक्त पथदिवे काढून घेण्यासाठी आउटसोर्सिंगमार्फत २२ लाइनमनची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. संबंधित कर्मचारी मनपाच्या नियंत्रणाखाली कामकाज करतील.

ज्या भागात रॉयल कंपनीने एलईडी लाईट लावले त्याच परिसरात ईईएसएलमार्फत पथदिवे लावल्या जात आहेत. अनावश्यक लाइटमुळे वीज देयकांत वाढ होईल. त्यामुळे असे पथदिवे काढून घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, लोकमतचे आभारी आहोत.- विजय अग्रवाल, महापौरशहरातील अनेक खांबांवर एलईडी लाइट लावल्या जात असताना त्याच परिसरात जुने सीएफएल पथदिवे कायम आहेत. गरज नसताना १० ते १५ फूट अंतरावर उभारल्या जाणारे पथदिवे हटवावे लागतील. अन्यथा मनपावर अतिरिक्त वीज देयकाचा ताण येईल, हे नक्की.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका