शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

‘अमृत’नंतर रस्त्यांची कामे निकाली काढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:01 IST

अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणी पुरवठा वितरण प्रणाली व भूमिगत गटार योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, त्या ठिकाणी अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते दुरुस्तीची कामे निकाली काढण्याचे निर्देश शासनाने महापालिकांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणार्‍या अनाठायी खर्चाला आळा बसणार आहे. 

ठळक मुद्देशासनाचे महापालिकांना निर्देशरस्त्यांची कामे पुढे ढकलण्याची सूचना

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणी पुरवठा वितरण प्रणाली व भूमिगत गटार योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, त्या ठिकाणी अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते दुरुस्तीची कामे निकाली काढण्याचे निर्देश शासनाने महापालिकांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणार्‍या अनाठायी खर्चाला आळा बसणार आहे. केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश न झालेल्या शहरांचा केंद्र व राज्य शासनाने ‘अमृत’ योजनेत समावेश केला. अमृत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहराच्या पाणी पुरवठा वितरण प्रणालीची कामे पूर्ण केल्यानंतर सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प (भूमिगत गटार योजना) पूर्ण करण्याचे शासनाचे महापालिकांना निर्देश आहेत. अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरांमधील जुन्या जलवाहिन्यांचे जाळे बदलून त्याऐवजी नवीन जाळे टाकल्या जात आहेत.  शहराची संभाव्य लोकसंख्यावाढ लक्षात घेता विविध भागात जलकुंभ उभारण्याचा समावेश आहे. भूमिगत गटार योजनेत सुद्धा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्त्यांलगत खोदकाम क रून मलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येईल. अर्थातच, या दोन्ही कामांसाठी शहराच्या कानाकोपर्‍यात मोठय़ा प्रमाणात खोदकाम केले जाणार आहे. दोन्ही योजना मंजूर होऊन कामांना सुरुवात झाल्यानंतरदेखील काही महापालिका क्षेत्रांमध्ये रस्ते दुरुस्तीची कामे केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. भूमिगत व पाणी पुरवठा योजनेसाठी केल्या जाणार्‍या खोदकामात रस्त्यांची तोडफोड केली जात आहे. मलवाहिनी व जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर पुन्हा रस्त्यांच्या दुरु स्तीवर कोट्यवधींचा खर्च होण्याची शक्यता पाहता भूमिगत गटार योजना व पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी केल्यानंतरच रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश शासनाने जारी केले आहेत. 

जबाबदारीतून ‘एमजेपी’ला वगळले!‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भूिमगत गटार योजनेसाठी तांत्रिक सल्लागार (पीएमसी) म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची (एमजेपी) नियुक्ती केली आहे. याकरिता दोन्ही योजनांच्या एकूण रकमेच्या बदल्यात ‘एमजेपी’ला तीन टक्के रक्कम महापालिकांकडून अदा केली जाणार आहे. शासनाने रस्ते दुरुस्तीच्या मुद्यावर संबंधित मनपाचे आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर जबाबदारी निश्‍चित केली आहे. तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या जीवन प्राधिकरणला या जबाबदारीतून पद्धतशीरपणे वगळण्यात आल्याने स्वायत्त संस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका