मेहकर ते अंत्री देशमुख या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे.
मेहकर ते अंत्री देशमुख रस्त्याची दुरवस्था
अंत्री देशमुख : मेहकर ते अंत्री देशमुख या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. मेहकर ते अंत्री देशमुख हा रस्ता ६ किमी अंतराचा असून, या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठी खड्डे पडलेली आहेत. या रस्त्याने असलेल्या नाल्यावर पूल बांधलेले नसल्याने पावसाळ्यात व इतरवेळी वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. येथून कोठेही बाहेरगावी जायचे असल्यास मेहकर येथूनच जावे लागते. मेहकर ते अंत्री देशमुख दरम्यान ४ ते ५ कि.मी. अंतराच्या रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने दगड, गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
Web Title: Removal of Mehkar to Angri Deshmukh Road