अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:17 IST2019-06-16T13:17:41+5:302019-06-16T13:17:48+5:30

ल २१ वर्षीय युवक विकी तराळे याने तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी करीत लगट साधली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

Rape on a Minor Girl of Akola | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अकोला - डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी तिच्या मामाच्या बुलडाणा जिल्ह्यातील कवठा बहादुरा या गावाला गेली होती. तेथील एका २१ वर्षीय युवकाने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने अकोल्यात आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार डाबकी रोड पोलीस ठाण्यात केल्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.
डाबकी रोड परिसरातील एक मुलगी उन्हाळ्यामध्ये तिच्या मामाच्या गावी बुलडाणा जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, तेथील २१ वर्षीय युवक विकी तराळे याने तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी करीत लगट साधली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी तिच्या आईवडिलांकडे आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिघांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार खंडेराव यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेऊन आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने पथक पाठवून आरोपीला बुलडाणा जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथून अटक केली. या लैंगिक छळातील आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.

 

Web Title: Rape on a Minor Girl of Akola