शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

देऊळ बंद: घरोघरी राम जन्मोत्सव, बंदद्वाराचे दर्शन घेऊन भाविक परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 12:04 PM

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श घेत श्रीराम भक्तांनीदेखील शासनाने दिलेल्या मर्यादा न ओलांडता घरात थांबूनच जन्मोत्सव साजरा केला.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: चैत्र मासातील शुद्ध नवमी तिथी. आंबा आणि कडूलिंबाच्या मोहोराचा दरवळणारा सुगंध. उष्ण वातावरण आल्हाददायक करणारा. दोन प्रहराच्या मधात माथ्यावर येऊन थांबलेला सूर्य, अशा वातावरणात गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.कोरोना विषाणू संसर्ग धोका लक्षात घेता, देश ‘लॉकडाऊन’ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श घेत श्रीराम भक्तांनीदेखील शासनाने दिलेल्या मर्यादा न ओलांडता घरात थांबूनच जन्मोत्सव साजरा केला.

शहरातील मंदिरात रामजन्मटिळक मार्गावर मोठे राम मंदिर, गांधी मार्गावर छोटे राम मंदिर, बिर्ला कॉलनीतील बिर्ला राम मंदिर या प्रमुख राम मंदिरांसह शहरातील इतर मंदिरांमध्ये अत्यंत साध्या रीतीने पूजा-अर्चना करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मंदिराबाहेरून दर्शन‘लॉकडाऊन’ असतानादेखील काही भाविक श्रीराम दर्शनासाठी घराबाहेर पडले. मंदिराचे कवाड बंद असूनही बाहेरूनच श्रीराम चरणी नतमस्तक झाले.

राम-जानकी पादुका पूजनश्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने रामनवमीच्या पर्वावर परंपरेनुसार श्रीराम-जानकी पादुका पूजन वेदपाठी ब्राह्मणांच्या वेदमंत्राने करण्यात आले. सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, गंगादेवी शर्मा, समितीचे अध्यक्ष विलास अनासने, मनीषा अनासने, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, अनुप शर्मा, आरती शर्मा, गिरीश जोशी, गिरिराज तिवारी व अनिल मानधने यावेळी उपस्थित होते. पंडित हेमंत शर्मा, राजेश तिवारी, राजेश शर्मा यांनी पूजा केली. महाआरती व अभिषेक करण्यात आला. अयोध्या येथील २४ चिन्हांकित श्रीराम-जानकी चरण पादुका अनुष्ठानचे पूजन करण्याची परंपरा असून, शोभायात्रेत ही पादुका सोबत असते. यावर्षी सर्व भक्तांच्या कल्याणासाठी तसेच कोरोना पृष्ठभूमीवर विशेष अनुष्ठान करण्यात आल्याचे आमदार शर्मा यांनी सांगितले.

सहा हजार गरजूंना रामप्रसादश्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने गुरुवारी अकराव्या दिवशीसुद्धा सहा हजार गरजूंना रामप्रसाद वितरित करण्यात आला. शहरातील माता नगर, शंकर नगर, लाडीस फैल, परदेशीपुरा, बाळापूर नाका, न्यू गुरुदेव नगर, कमला नेहरू नगर, अनिकट या भागात प्रसादाचे वाटप करण्यात आले.

शोभायात्रा आणि रामदरबार केला ‘मिस’श्रीराम शोभायात्रा समिती आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो; मात्र यावेळी शोभायात्रा रद्द झाली. गांधी चौकातील राम दरबारही उभारण्यात आला नसल्याने हे खूप ‘मिस’ करीत असल्याच्या भावना अकोलेकरांनी व्यक्त केल्या.

घरात बसून रामभक्तीघरोघरी गीत रामायणातील गाण्याचे स्वर बाहेर ऐकू येत होते. अनेकांनी रामचरितमानसचे पठण केले. संस्कार भारती, राणी सतीधाम आदी संघटना, संस्थांनी समाजमाध्यमांतून घरबसल्या भजन ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. नामवंत गायकांनी लाइव्ह व्हिडिओद्वारा राम भक्तांच्या घरी हजेरी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण