अकोला: अकोला लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असता, सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनुप धोत्रे यांच्या जाहीर सभेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळला. यावेळी पावसात चिंब भिजलेल्या उपस्थित नागरिकांनी मोदी यांच्या नावाचा जयघोष केल्याचे पहावयास मिळाले.
अकोल्यात अमित शाह यांच्या सभेला पावसाची हजेरी
By आशीष गावंडे | Updated: April 23, 2024 17:45 IST