वरिष्ठांच्या छळाला कंटाळून रेल्वे ट्रॅकमनचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:25 IST2020-02-29T12:25:07+5:302020-02-29T12:25:14+5:30

नितीन शहाजी खंडारे यांनी विष प्राशन करून गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Railway trackman suicidal attempt | वरिष्ठांच्या छळाला कंटाळून रेल्वे ट्रॅकमनचा आत्महत्येचा प्रयत्न

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून रेल्वे ट्रॅकमनचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोला: रेल्वे ट्रॅकमनने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
रेल्वे ट्रॅकमन नितीन शहाजी खंडारे यांनी विष प्राशन करून गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. खंडारेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. खंडारे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी आणि लिपिकांनी नाशिक जिल्ह्यात बदली केली असल्याचा आरोप केला. रेल्वेतील अधिकारी राजेश चिखले, निकाक्षित कुमार, आर. छाबडा, बी. आर. धाकडे आणि आर. वासे या अधिकाऱ्यांची नावेसुद्धा त्यांनी चिठ्ठीत नमूद केली आहेत. वरिष्ठांकडे याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही दखल न घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Railway trackman suicidal attempt