अकोला शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे; विशेष पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:34 IST2018-03-22T18:34:35+5:302018-03-22T18:34:35+5:30
अकोला - खदान व सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सायंकाळी छापेमारी केली.

अकोला शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे; विशेष पथकाची कारवाई
अकोला - खदान व सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सायंकाळी छापेमारी केली. या दोन जुगार अड्ड्यांवरून चार जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवी खदान नाका येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून शेख महेबूब शेख दाऊद रा. खंडेलवाल भवनजवळ अकोला, दीपक माणिक तिरुपती रा. ख्रिश्चन कॉलनी जेतवन नगर, सुप्रसाद रामप्रसाद बरदिया रा. जेतवन नगर या तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख व मोबाइल, असा एकूण तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर मोठ्या उमरीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून, या ठिकाणावरून दिनेशकुमार राजकुमार जैन याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चार जुगारींविरुद्ध सिव्हिल लाइन्स व खदान पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व त्यांच्या पथकाने केली.