आयपीएल सट्ट्यावर धाड; एकास अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 10:43 IST2020-10-23T10:43:01+5:302020-10-23T10:43:31+5:30

Akola, Beating on IPL, Crime News पोलिसांनी आरोपी तौफिक याला अटक करून १ लाख, ३,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Raids on IPL betting; One arrested, one lakh confiscated | आयपीएल सट्ट्यावर धाड; एकास अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

आयपीएल सट्ट्यावर धाड; एकास अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

अकोला: अकोट फैल स्थित इमामवाडा परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बुधवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आरोपी तौफिक याला अटक करून १ लाख, ३,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अकोट फैल परिसरातील इमामवाडा येथील रहिवासी तौफिक नामक व्यक्तीच्या घरी रॉयल चॅलेंजर बँगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर या आयपीएलच्या सामन्यावर बुधवारी सट्टा लावण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी तौफीक अब्बस युनूसअली जाफरी (२१) याच्या राहत्या घरी धाड टाकली. यावेळी आरोपी मोबाइलवरून सट्ट्याचा खेळ खेळताना आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन टीव्ही, सेट अप बॉक्स, रोख व इतर साहित्य, असा एकूण १ लाख ३,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raids on IPL betting; One arrested, one lakh confiscated