मुंडगावातील जुगार अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:33 IST2019-01-29T12:33:06+5:302019-01-29T12:33:45+5:30

अकोला - मुडंगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापेमारी करून चार जुगारींना रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Raid on gambling in Mundgaon | मुंडगावातील जुगार अड्डयावर छापा

मुंडगावातील जुगार अड्डयावर छापा

अकोला - मुडंगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापेमारी करून चार जुगारींना रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या जुगाऱ्यांवर अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईतील दोन जुगारी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपूरे यांनी सोमवारी रात्री केली.
मुंडगाव येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून मुंडगाव येथे केलेल्या छापेमार कारवाईत सुरेश बकुवाले (६०) रा. अकोट, सुनिल सिरसाट (२५) रा. मुंडगाव, शेख अमिर शेख कासम (७१) रा. कालवाडी या जुगाºयांना अटक करण्यात आली असून, त्याच्यावर अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. तर याच कारवाईतील किशोर ठाकरे व सुनील नाहाळे हे दोन जुगारी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपूरे यांनी केली आहे.

 

Web Title: Raid on gambling in Mundgaon