जुगार अड्डयावर छापा; ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 15:30 IST2018-10-21T15:29:49+5:302018-10-21T15:30:16+5:30

अकोला - गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला.

Raid on gambling ; 32 thousand worth of money seized | जुगार अड्डयावर छापा; ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्डयावर छापा; ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


अकोला - गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणावरुन ४ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आझाद कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या अंदर बाहर नावाच्या नवीन जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनातील पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरुन अफजल खान फीरोज खान रा. बैदपुरा, मुसबीर खान आतीक खान रा. बैदपुरा, सैयद आतीक सैयद करीम रा. सिंधी कॅम्प व मो. हनीफ मो. इसाक रा. मुजफ्फर नगर या चार जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख तीन हजार रुपये, ९ हजार रुपये कीमतीचे ३ मोबाईल आणि २० हजार रुपये कीमतीचा एक मोबाईल असा एकून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विलास पाटील, एएसआय जायभाये, प्रमोद पाटील, विपुल सोळंके, नागसेन वानखडे, ज्ञानेश्वर रडके यांनी केली.

 

Web Title: Raid on gambling ; 32 thousand worth of money seized