राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 01:13 PM2022-11-17T13:13:21+5:302022-11-17T13:23:03+5:30

संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात राहुल गांधी वरखेड येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत. 

Rahul Gandhi will interact with the officials of the Sambhaji Brigade! | राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

googlenewsNext

अकोला: भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे 100 पदाधिकारी व कार्यकर्ते 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता वडेगाव येथे दाखल झाले आहेत. संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात राहुल गांधी वरखेड येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत. 

संभाजी ब्रिगेड व शिवसेना यांची नुकतीच आघाडी झाली आहे. देशामध्ये सुरू असलेले धर्माचे राजकारण आणि वाढत असलेली बेरोजगारी, सामाजिक विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. 

या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शंभरावर कार्यकर्ते वाडेगाव येथे दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविणारा असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस  सौरभ खेडेकर यांनी दिली.

Web Title: Rahul Gandhi will interact with the officials of the Sambhaji Brigade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.