शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अधिक दराने किराणा विकणारे ‘एफडीए’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 1:50 PM

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाल्यानंतर अन्न विभागाने आता अशा दुकानदारांची तपासणी सुरू केली आहे.

-  सचिन राऊतअकोला: कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर शहरातील किराणा दुकानदारांनी याच संधीचा फायदा घेत गहू, तांदूळ तसेच डाळी व कडधान्याची अधिक दराने विक्री सुरू केली असून, अशा दुकानदारांच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाल्यानंतर अन्न विभागाने आता अशा दुकानदारांची तपासणी सुरू केली आहे. गोरक्षण रोडवरील त्रिगुणा तसेच कंचन या दोन दुकानांची तपासणी करून त्यांच्या दुकानातील गव्हाचे तसेच कडधान्याचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकान सुरू असून, त्यांनी संचारबंदीचा फायदा घेत काही वस्तूंची अधिक दराने विक्री सुरू केली आहे. यामध्ये गव्हाचा तुटवडा असल्याची अफवा करून ५० किलो गव्हाच्या पोत्यामागे तब्बल ५०० ते ७०० रुपये अधिक घेण्यात येत आहेत. गोरक्षण रोडवरील दोन दुकानांमध्ये अशाच प्रकारे जादा दराने विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही दुकानांची तपासणी करून गव्हासह कडधान्याचे नमुने घेऊन दुकानांवर कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे. यासह आता शहरातील किराणा दुकाने अन्न प्रशासनाच्या रडारवर असून, त्यांनी जिल्ह्यातील किराणा दुकानांची तपासणी सुरू केली आहे. या काळात काळाबाजार करणारे तसेच अधिक दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध विभागाने स्पष्ट केले आहे. अन्यथा परवाना निलंबनाची कारवाईमनपाचे उपायुक्त वैभव आवारे व त्यांच्या पथकाने गोरक्षण रोडवरील किराणा दुकानांची तपासणी केल्यानंतर यापुढे असा प्रकार आढळल्यास दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यासह शहरात कुणीही अशा प्रकारे अधिक दराने विक्री करताना किंवा काळाबाजार करीत असल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शहरासह जिल्ह्यात कोणत्याही दुकानामध्ये अशा प्रकारे गैरव्यवहार तसेच अधिक दराने विक्री सुरू असल्यास त्याची माहिती अन्न प्रशासनाला देण्यात यावी, अशा दुकानांवर निश्चितच कठोर कारवाई करून दुकानातील वस्तूंचे नमुने घेऊन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल.- रावसाहेब वाकडे,अन्न निरीक्षक, एफडीए, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFDAएफडीए