शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जनजागृती अभियान - ईश्‍वर बाळबुधे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:46 AM

अकोला : ओबीसीमधील समाविष्ट जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या १२ मागण्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असून, त्यासाठीच जनजागृती अभियान हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे पत्रकार परिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ओबीसीमधील समाविष्ट जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या १२ मागण्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असून, त्यासाठीच जनजागृती अभियान हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऊठ ओबीसी जागा हो. नव्या क्रांतीचा धागा हो.., अशी घोषणा घेऊन राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने १९ डिसेंबर ते १४ एप्रिलपर्यंत दीक्षाभूमी नागपूर मार्गे कोल्हापूर-पुणे बारामतीपर्यंत अभियान राबविले जात आहे. त्यासाठी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे बुधवारी अकोल्यात आले होते. पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसींच्या १२ कलमी मागण्यांसाठी हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह असावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहीर करून, त्यांना नीती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजारे कोटी भांडवल द्यावे, उद्योग व्यवसायासाठी १0 लाखांपर्यंत कर्ज र्मयादा वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, शेतकर्‍यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करा, शेतकर्‍यांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी शून्य व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून द्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे पण पुढे विधानसभा-लोकसभेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशिप ताबडतोब अदा करण्यात यावी, स्पर्धा परीक्षेत महिलांना क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी, देशांमध्ये १६00 ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले, परंतु नॉन क्रिमिलेअरच्या अटीमुळे प्रक्रियेतून बाद ठरविले, त्यांना पुन्हा संधी द्यावी, या मागण्या आहेत. पत्रकार परिषदेला बाळबुधेंसह श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, डॉ. आशा मिरगे, अनिल मालगे, दिलीप आगळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक पदाधिकार्‍यांची गैरहजेरी चर्चेची होती. 

मी विदर्भवादी!वेगळय़ा विदर्भासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवारांची भूमिका वेगळी असली, तरी मी व्यक्तीश: वेगळा विदर्भ आणि मराठा आरक्षणाच्या सर्मथनार्थ आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी व्यक्त केले. 

छगन भुजबळ आमचे नेतेओबीसी नेत्यांना आणि समाजाला संपविण्याचा कट सध्या राज्यात सुरू आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओबीसी नेते आहेत. न्यायपालिकेवर आमचा विश्‍वास असून, त्यांच्या पाठीशी पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.-

टॅग्स :AkolaअकोलाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी