पोलीस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:28+5:302021-04-21T04:18:28+5:30
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा निर्णय अकोला : आगामी काळात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. यादरम्यान ...

पोलीस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा निर्णय
अकोला : आगामी काळात मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना प्राप्त असलेल्या अधिकाराच्या अन्वये कलम ३६ नुसार जिल्ह्यातील पोलीस फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान करण्यात आले आहे. २१ ते २७ एप्रिल या कालावधीसाठी हे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. यादरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रीतीने चालतील, त्यांची वर्तणूक कशी असावी, याविषयी निर्देश देणे मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देण्याची जबाबदारी या पोलीस अधिकाऱ्यांवर राहणार आहे. या सोबतच मिरवणूक कोणत्या मार्गाने जावी, कोणत्या मार्गाने जाऊ नये याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सर्व रस्त्यांवर व नद्यांच्या घाटावर, सार्वजनिक ठिकाणी, जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्याही सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, वाद्य वाजविण्यासाठी नियम बांधून देण्यात आले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे यांसह विविध जबाबदाऱ्या या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा निर्णय घेतला आहे.