दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागितले प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 13:58 IST2018-11-17T13:57:57+5:302018-11-17T13:58:04+5:30
अकोला : जिल्हाधिकाºयांचा तहसील अकोला दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागितले प्रस्ताव!
- संतोष येलकर
अकोला : जिल्हाधिकाºयांचा तहसील अकोलादुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले आहेत. पीक नुकसानाचे क्षेत्र आणि दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पाचही तहसीलदारांना दिला.
यावर्षीच्या पावसाळ्यात पावसातील खंड, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत खरीप पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत लवकरच मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मदत निधी मागणीचे प्रस्ताव सोमवार, १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसीलदारांना दिला आहे.
प्रस्तावात अशी मागितली माहिती!
दुष्काळी परिस्थितीत पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि राष्ट्रीय आपत्ती मदत निधी (एनडीआरएफ) निकषानुसार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी आवश्यक असलेला निधी इत्यादी प्रकारची माहिती मदत निधी मागणीच्या प्रस्तावात तहसीलदारांकडून मागविण्यात आली आहे.
३.१७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरीवरील) खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ८६ हजार ६२३ हेक्टर, बार्शीटाकळी तालुक्यात ५१ हजार ५६२ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ५३ हजार ३६ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ६० हेक्टर ५९१ हेक्टर व मूर्तिजापूर तालुक्यात ६५ हजार ४७२ हेक्टरवरील पीक नुकसानाचा समावेश आहे.