जिल्ह्यातील १९५ पोलिस शिपायांना पदोन्नती

By Admin | Updated: May 3, 2014 19:12 IST2014-05-03T13:23:34+5:302014-05-03T19:12:01+5:30

अकोला जिल्हा पोलिस दलातील १९५ पोलिस शिपायांना पोलिस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी या पोलिसांना पदोन्नती देण्यात आली असून, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १ मे रोजी हे आदेश दिले.

Promotion to 195 police forces in the district | जिल्ह्यातील १९५ पोलिस शिपायांना पदोन्नती

जिल्ह्यातील १९५ पोलिस शिपायांना पदोन्नती

अकोला : अकोला जिल्हा पोलिस दलातील १९५ पोलिस शिपायांना पोलिस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी या पोलिसांना पदोन्नती देण्यात आली असून, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १ मे रोजी हे आदेश दिले. पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचार्‍यांमध्ये २३ पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयातील असून, इतर पोलिस कर्मचारी शहरातील सहा व जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यातील आहेत. यासोबतच शहर वाहतूक शाखेतीलही काही पोलिस कर्मचार्‍यांचा या पदोन्नतीच्या यादीमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १९५ पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस नाईक पदावर पदोन्नती मिळाली असून, तशा प्रकारचे आदेश पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी १ मे रोजी पारित केले आहेत.

Web Title: Promotion to 195 police forces in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.