कर्तव्यात कसूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:01 IST2018-12-15T18:01:28+5:302018-12-15T18:01:48+5:30
वाशिम येथील एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षिका करुणा बडगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.

कर्तव्यात कसूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कर्तव्यात कसूर करणे, विनापरवानगी रजेवर जाणे, आढावा बैठकीत माहिती उपलब्ध करून न देणे आदि कारणांखाली वाशिम येथील एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षिका करुणा बडगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिनांक १३ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सीडीपीओ आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या बैठकीत बडगे या गैरहजर होत्या. सदर बैठकीत बडगे यांना निलंबित करण्याचे आदेश मीना यांनी दिले होते, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका गिºहे यांनाही सदर सभेत गैरहजर असल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महिला व बाल विकास विभागाच्या आढावा सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सभेत माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे प्रस्ताव न आणलेल्या पर्यवेक्षकांची सीईओ मीना यांनी चांगलीच कानऊघडणी केली. अंगणवाडी केंद्र मध्ये १०० टक्के मुलांची उपस्थिती, पोषण आहार, आरोग्य, गोवर व रूबेला लस याबाबत सुचना करण्यात आल्या. यावेळी आपल्या कर्तव्यात कसूर करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची गय केली जाणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना म्हणाले. बैठकीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, विस्तार अधिकारी तुषार जाधव आणि मदन नायक यांच्यासह सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती.