शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

वारी हनुमान येथील ‘मामाभाचा’ डोहासंदर्भात आराखडा सादर करा - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 7:50 PM

​​​​​​​तेल्हारा (अकोला): वारी हनुमान येथील मामाभाचा डोहासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना संदर्भात समिती नेमून प्रत्यक्ष कामाचा  आराखडा तयार करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांना  दिले.

ठळक मुद्देगत पंचवीस वर्षात या डोहात बुडून मरण पावलेल्या पर्यटकांची संख्या  पोहोचली एकशे एकाहत्तरच्यावर  

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा (अकोला): वारी हनुमान येथील मामाभाचा डोहासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या  दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना संदर्भात समिती नेमून प्रत्यक्ष कामाचा  आराखडा तयार करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांना  दिले.

गेल्या वर्षभरपासून शासन दरबारी हा विषय सातत्याने लावून धरणारे उत्तम  नळकांडे यांनी शासकीय विश्रामगृहावर डॉ. रणजित पाटील यांची भेट घेतली. या प्रसंगी बैठकीत ते बोलत हेाते. याप्रसंगी युवाशक्तीचे भवानी प्रताप, मयूर चोपडे,  विजय बोर्डे यांनीसुद्धा या विषयावर करावयाच्या उपाययोजनांसदर्भात सूचना  मांडल्या. आराखडा आल्यानंतर विकासकामाकरिता निधी उपलब्ध करून  देण्यात येईल, असे आश्‍वासन ना.पाटील यांनी दिले. मागील वर्षी डॉ. रणजित  पाटील यांनी मामा भाचा डोहास प्रत्यक्ष भेट दिली होती. वान प्रकल्प व महसूल  अधिकारी यांच्या वेळकाढू धोरणामुळे वर्षभरापासून कुठलीही कार्यवाही झाली  नाही. आता तरी प्रश्न मार्गी लागावा, अशी विनंती ना. पाटील यांच्याकडे करण्यात  आली. यावर्षीसुद्धा या डोहात तीन तरुणांचा बुडाल्याने मृत्यू झाला. मागील  पंचवीस वर्षात बुडून मरण पावणार्‍या पर्यटकांची संख्या एकशे एकाहत्तरच्यावर  पोहोचली आहे. याप्रसंगी माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, तहसीलदार डॉ.  येवलीकर, एकनाथ ताथोड, सुदेश शेळके, पुंडलीकराव अरबट, सदानंद  खारोडे, धर्मेश चौधरी, नीलेश जवकार, शिवराज अहेरकर, योगेश विचे, भाजप  कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Telharaतेल्हाराDr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटील