मामा-भाच्या डोहासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे तातडीचे निर्देश

By Admin | Published: May 17, 2017 08:16 PM2017-05-17T20:16:50+5:302017-05-17T20:16:50+5:30

तेल्हारा :जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वारी हनुमान येथील मामाभाचा नामक डोहाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश वान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शेगाव यांना दिले आहेत.

Emergency directives of the Collector on the Maternal Mausoleum | मामा-भाच्या डोहासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे तातडीचे निर्देश

मामा-भाच्या डोहासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे तातडीचे निर्देश

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

तेल्हारा : वारी हनुमान येथील नदीपात्रामध्ये असलेल्या मामाभाचा नामक डोहामध्ये तरुण पर्यटक बुडून मरण पावणाऱ्या घटनेसंदर्भात गाडेगाव येथील उत्तम नळकांडे यांनी तत्कालिन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची प्रत्यक्ष भेट घेमन यासंदर्भात सविस्तर निवेदन देऊन या प्रकरणामध्ये लक्ष देण्याचे आवाहन केले होते. तेथे उपस्थित अकोटचे एसडीओ उदय राजपूत यांना निवेदनकर्त्यास विश्वासात घेमन वान प्रकल्पाचे डेप्युटी इंजिनिअर यांचेकडून यासंदर्भात माहिती मागविण्यास सांगितली होती. या प्रकरणामध्ये त्यांची संवेदनशून्य दिसून आल्यानंतर १२ एप्रिल रोजी उत्तम नळकांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्मरणपत्र पाठविल होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर वान प्रकल्पाच्या हनुमानसागर जलाशयामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वान नदीमध्ये सोडल्या जातो. त्यामुळे डोहामध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम शक्य होणार नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी, हे निवेदनकर्त्याने स्मरणपत्रामध्ये नमुद केले होते. नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी या स्मरणपत्राची त्वरेने दखल घेत त्या अनुषंगाने सदर अर्जातील बाबी या वान प्रकल्पाशी संबंधित असून अर्जातील बाबींच्या अनुषंगाने आवश्यक चौकशी करून अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश वान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शेगाव यांना दिले आहेत. सोबतच निवेदनकर्त्यास आपले स्तरावरून अवगत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Web Title: Emergency directives of the Collector on the Maternal Mausoleum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.