शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; केळीवेळीत रंगणार खासदार चषक कबड्डी महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 8:20 PM

अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणारस्पर्धा संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.रविवारी स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दाळू गुरुजी यांनी स्पर्धेविषयी माहिती सांगितली. केळीवेळी येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यावर्षी ७५ वर्ष पूर्ण करीत आहे. या हीरक महोत्सवी वर्षात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ८ ते ११ फेब्रुवारी २0१८ या कालावधीत आयोजित या स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोपासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले.स्पर्धेत १२ राज्यातील मुले व मुलींचे संघ येणार आहेत. महिला व पुरुष अशा दोन गटात स्पर्धा होतील. अन्य राज्यातून आलेल्या खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक व खेळाडू तसेच अन्य नागरिकांसाठी स्पर्धा कालावधीत अकोला, दहीहांडा बसस्थानकाहून अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अकोला शहरापासून केळीवेळी गावापर्यंत ग्राम मंडळाचे फलक लावल्या जातील. मैदानावर स्वागत कक्ष, माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. होणारी गर्दी लक्षात घेता रोज ड्रोन कॅमेरा व एलसीडीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वैद्यकीय पथक, अग्निशमन दल स्पर्धास्थळी हजर राहणार असून, खेळाडू व प्रेक्षक यांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, अनिल गावंडे यांनीदेखील स्पर्धेविषयी माहिती सांगितली. पत्रकार परिषदेला गजानन मोंढे, डॉ. राजकुमार बुले, डॉ. जगन्नाथ ढोणे, दिनकर गावंडे, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, गजूसिंह ठाकूर, वासुदेव नेरकर उपस्थित होते.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणKabaddiकबड्डी