वीज वितरणचे पिंजर येथील कार्यालय शिकस्त
By Admin | Updated: May 13, 2014 19:17 IST2014-05-13T18:13:12+5:302014-05-13T19:17:07+5:30
खिडक्या, काचा गायब, कोट्यवधींची संपत्ती बेवारस

वीज वितरणचे पिंजर येथील कार्यालय शिकस्त
पिंजर: वीज वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाची इमारत अतिशय शिकस्त झाली आहे. इमारतीच्या दरवाजाला भगदाड पडले असून, खिडक्यांच्या काचाही गायब आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची संपत्ती बेवारस असल्याचे दिसते.
पिंजर येथे वीज वितरण कं पनीचे ३३ के.व्ही. कें द्र असून, या केंद्रातून पिंजर परिसरातील ४३ खेडेगावांत वीज पुरवठा केला जातो. या ४३ गावांतील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी येथे कार्यरत असलेल्या १५ कर्मचार्यांसाठी कार्यालयही बांधण्यात आले आहे. कार्यालयाची ही इमारत शिकस्त झाली असून, कधी पडेल सांगताच येत नाही. इमारतीचे दरवाजे तुटले असून, त्यांना जाड पृष्ठे लावून झाकण्यात आले आहे. खिडक्यांच्या काचा फु टल्या असून, तेथेही कागदी पृष्ठे लावण्यात आली आहेत. कार्यालयात येणार्या ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. हे कार्यालय गावाबाहेर आहे. त्यातच त्याची अवस्था मोडकळीस आल्याने रात्रीच्या वेळी तेथे सुरक्षारक्षकांची संख्या अधिक असायला हवी; परंतु ती काळजीही घेतल्याचे दिसत नाही. येथील कनिष्ठ अभियंता मुख्यालयीच हजर राहत नसल्याने त्यांचा कर्मचार्यांवर वचक राहिला नाही. या वीज केंद्रावरील ४३ खेडेगांवासाठी येथे ११ लाईलमन, २ यंत्र चालक, १ कनिष्ठ अभियंता आणि रात्रीच्या वेळी गस्तीसाठी दोन चौकीदार आहेत. रात्रीच्या वेळी या कार्यालयात केवळ एक ऑपरेटर आणि एकच चौकीदार हजर असतो. कार्यालची इमारत शिकस्त असतानाच कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे वीजग्राहकांच्या समस्या लवकर निकाली लागत नाहीत, असे असले तरी, वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना मात्र त्याचे काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसते. या कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करून ग्राहकांच्या समस्या त्वरित निकाली काढण्यासाठी कर्मचार्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी परिसरातील वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे.