The portals closed; What about the charges? | महापोर्टल बंद झाले; शुल्काचे काय, परीक्षार्थींचा सवाल?

महापोर्टल बंद झाले; शुल्काचे काय, परीक्षार्थींचा सवाल?

अकोला : राज्य शासनाने नोकर भरतीसाठी सुरू केलेले महापोर्टल बंद केले आहे. या पोर्टल संदर्भात तक्रारी करणाऱ्यांना या निर्णयाने समाधान झाले असले तरी राज्य सरकारच्या सात विभागांतील भरतीकरिता ३४ लाखांवर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सशुल्क अर्ज दाखल केले होते.

आता हे पोर्टलच बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नव्या भरती प्रक्रियेदरम्यान या शुल्काचा विचार व्हावा, अन्यथा सदर शुल्क परत करावे, अशी मागणी होत आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने १९ सप्टेंबर २0१७ रोजी एका अध्यादेशाद्वारे महापोर्टलची स्थापना केली होती.

Web Title: The portals closed; What about the charges?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.