आलेगाव-बाभूळगाव रस्त्याची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST2021-07-11T04:14:58+5:302021-07-11T04:14:58+5:30
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील आलेगाव-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांमध्ये ...

आलेगाव-बाभूळगाव रस्त्याची दयनीय अवस्था!
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील आलेगाव-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव-बाभूळगाव हा मार्ग महत्त्वाचा असून, हा मार्ग वाशिम व बुलडाणा जिल्ह्याला जोडतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. आलेगाव-बाभूळगाव रस्ता खड्डेमय झाला असून, वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. गत काही वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
-------------------
काम मंजूर; मुहूर्त निघेना!
माझोड-आलेगावमार्गे-राजगड-बुलडाणा सीमेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.