शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

नद्यांचे प्रदूषण; घोटला जलचरांचा श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 14:25 IST

काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नद्यांमध्ये सर्रासपणे सोडले जाणारे सांडपाणी, घाण कचरा, निर्माल्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमालीचे घटते. पर्यावरणातील जैवसाखळीत महत्त्वाचे घटक असलेल्या जलचर प्राण्यांचा श्वास घोटण्याचे काम त्या माध्यमातून मानवाद्वारे होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत.दरवर्षी ठरावीक काळात नद्यांतील पाणी नमुन्यांचे रासायनिक परीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा या नद्यांतील पाण्याची तपासणी करण्यात आली. या नद्यांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी, गुराढोरांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान या तपासणीच्या निमित्ताने पुढे आले आहे. विशेष काटेपूर्णा, मोर्णा नद्यांचे पाणी पूर्णा नदीत मिसळते. पूर्णा नदीवर नेर-धामणा बॅरेज, पुढे जिगाव प्रकल्प आहे. या प्रकल्पातून पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी मिळणार आहे; मात्र या तीनही नद्यांतील पाणी प्रदूषित असताना त्याचा वापर करणाºया मानवी तसेच इतर सजीवांवरही होणार आहेत. त्याचा फटका मानवासोबतच पर्यावरणीय घटकातील जैवसाखळीलाही बसत आहे. येत्या काळातील पर्यावरणाचा समतोल टिकवायचा असेल, तर नद्यांचे प्रदूषण करणाºया घटकांना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यासाठीच सद्यस्थितीत नद्यांतील पाणी नमुन्यांची तपासणी करून त्याचे निष्कर्ष पुढे आणले जात आहेत. जिल्ह्यातील तीनही नद्यांच्या नमुन्यांची तपासणी सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आली. त्या निष्कर्षात पाण्यातील घटकांचे प्रमाण चिंताजनक आहे. 

तीन ठिकाणी घेतले पाणी नमुने पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन नद्यांतील ठरावीक ठिकाणी नमुने घेतले आहेत. त्यामध्ये मोर्णा नदीत अकोला शहरातील गणेश घाट, काटेपूर्णा नदी- कुरणखेड, तर पूर्णा नदीचे गांधीग्राम येथे नमुने घेण्यात आले. विशेष सण-उत्सवाच्या काळापूर्वी, उत्सव सुरू असताना आणि उत्सवाच्या समारोपानंतर नमुने घेत त्यांची तपासणी करण्यात आली.  पाण्याचा सामू, आॅक्सिजनमध्ये तफावत पाणी पिण्यायोग्य, उद्योग, जलचरांसाठी, वापरासाठी असताना त्यामध्ये आवश्यक असलेला सामू (पीएच) तसेच आॅक्सिजनचे प्रमाण ठरले आहे. कमी किंवा अधिक असल्यास पाण्याची गुणवत्ता बाधित होते. त्या नमुन्यांमध्ये सामूचे प्रमाण ६ ते ८ पेक्षा कमी-अधिक असणे, आॅक्सिजनचे प्रमाण मोर्णा नदीत तर कमालीचे अल्प आहे. या ठिकाणी प्रतिलीटर १.५२ मिलीग्रॅम एवढे कमी ते आहे. .

टॅग्स :Akolaअकोलाwater pollutionजल प्रदूषणMorna Riverमोरणा नदी